चांगदेव चतुष्टय (बिढार, हूल, जरीला, झूल)

चांगदेव चतुष्टय (बिढार, हूल, जरीला, झूल)

चांगदेव चतुष्टय (बिढार, हूल, जरीला, झूल)
लेखक: भालचंद्र नेमाडे 
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन

चांगदेव चतुष्टय मध्ये चार कादंबरींचा समावेश आहे. बिढार, हूल, जरीला आणि झूल.

गेली काही वर्ष भालचंद्र नेमाडे यांच साहित्य वाचायच आहे असं मनात होतं. अखेरीस या लॉकडाऊन मध्ये ते शक्य झालं.

काही पुस्तकं ही आपलं वाचन आणि विचार परिपक्व करायला हातभार लावतात चांगदेव चतुष्टय ही याच प्रकारात मोडते. चांगदेव पाटील ला समजायला वेळ लागेल. मलापण अजून पूर्णपणे तो समजला नाही. पण चांगदेव ला समजून घेताना आपण नकळत पणे इतर गोष्टी समजून घेतो आणि इथंच पुस्तक आपल्याला जिंकून जाते.

तर कादंबरी चा नायक ( तसा तो इतर नायकाप्रमाणे बिलकुल नाही) चांगदेव पाटील , त्याच कॉलेज आणि कॉलेज नंतर ची नोकरी यावर कथानक फिरत राहते. अतिशय बुद्धिमान आणि परिस्थितीशी निरंतर झगडणारा चांगदेव आपलं बिढार घेऊन दरवर्षी नवीन ठिकाणी जातो. प्रत्येक ठिकाणी त्याला चांगली आणि वाईट अशी दोन्ही लोकं भेटतात. अतिशय वेगळ्या स्तरावर जातीयता अनुभवता येते. पण त्याचा यासर्वावरचा दृष्टिकोन मनाला भावतो. त्याची जीवनाविषयीची बेफिकरी कधी कधी आपल्याला चीड आणते. पण त्याचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या डोळ्यात चांगलंच अंजन घालतो.

नेमाडेंची लिखाणाची शैली अप्रतिम आहे. काही संभाषणामध्ये स्थानिक भाषा इतक्या अस्सखलीतपणे वापरल्या आहे की वाचताना भाषेची लय डोक्यात उमटून जाते. हे पुस्तक ७० च्या दशकातील आहे यावर विश्वास बसत नाही, तसे म्हंटले तर या पुस्तकाला काळाची बंधने नाही. यातील समाजातील प्रसंग आणि स्थिती आपण आपल्या आजूबाजूला आजही पाहू शकतो. काऱ्या लोकांची संभाषणे बटबटीत न करता अगदी अचूकपणे मांडलीआहे.

ही चार पुस्तके काही फार मोठी नाही पण एका बैठकीत वाचू नका. जेवढेपण वाचाल त्यावर स्वतः चिंतन करा किंवा कोणा बरोबर तरी चर्चा करा. आपण काय वाचले आणि त्याचा आवाका केवढा मोठा आहे हे लक्षात येईल.

हे पुस्तक त्या सर्वांनी वाचावे ज्यांना परिपक्व वाचनाचा आनंद घ्यायचा आहे. हे पुस्तक निश्चितच हलके फुलके नाही त्यामुळे काही वाचकांचा ते भ्रमनिरास करेल.

या पुस्तकांवर फार चांगल्या समीक्षकांनी यापूर्वीच लेखन केलं आहे. तरी मला माझा स्वानुभव सांगावा असे वाटले म्हणून लिहले यावर चर्चा करायला निश्चित आवडेल.

Comments

Popular Posts