तुंबाडचे खोत

तुंबाडचे खोत


 
तुंबाडचे खोत (खंड १ व २)
लेखक: श्री. ना. पेंडसे
प्रकाशक: कॉन्टिनेन्टल प्रकाशन

एखादं पुस्तक वाचायला घ्यावं आणि बघता बघता त्या पुस्तकांन वाचकाला मोहिनी घालावी अशी किमया करणार एक पुस्तक म्हणजे श्री. ना. पेंडसे यांचं तुंबाडचे खोत.

पेंडसे यांचं हे पहिलं पुस्तक जी मी वाचले. यांनी हे पुस्तक दोन खंडा मध्ये विभागले आहे. पुस्तक वाचताना सर्व पात्रे जिवंत होऊन आपल्या समोर उभी राहतात. नुसतीच पात्र नव्हे तर तुंबाड, जगबुडी, काही अंशी तेव्हाची मुंबई देखील समोर उभी करायची किमया लेखकाने केली आहे याच बरोबर कोकणातील बारकावे लेखकाने अचूक टिपले आहे.

तर ही कथा आहे तुंबाड गावातील खोत घराण्याची जी सुरू होतो स्वातंत्रपूर्व काळात आणि खोतांच्या ३ पिढ्यांबरोबर पुढे सरकत राहते. कथानक सुरवातीपासूनच वाचकांवर पकड घेते. पूर्ण पुस्तक आपल्याला ३ पिढ्यांची जिवंत वाटावी अशी सफर करूनच आणते

यातील काही पात्रे लक्षात राहतात ती

दादा खोत: रगेल वृत्ती आणि अघोरी प्रयोग यामुळे शेवटपर्यंत आपल्या लक्षात राहतो. गोष्टी आणि घटनांचा एक पिढीमधून दुसऱ्या पिढीत विपर्यास कसा होतो आपल्याला वाचायला मिळतं.

बजाबा: वाघावर झेप घेणारा आणि सदैव मदतीस तत्पर धाडसी असा बजाबा वाचकांना समोर असेपर्यंत खिळवून ठेवतो. त्याचा शेवट हा मनाला टोचणी लावून जातो.

नरसू: वडिलांनी वाड्यातून बाहेर पडून देखील वाड्याला कधीच वेगळी वागणूक दिली नाही. हाच वारसा नरसू ने पुढे चालू ठेवला. नरसू म्हणजे एक वेगळंच रसायन लेखकानं उभं केलं आहे. हाच नरसू वाचकाला एवढं आपलंस करतो की त्याचं सुख-दुःख स्वतःच वाटतं. गांधी की टिळक नक्की बरोबर कोण यावर विचार करणारा नरसू शेवटी असा काही निर्णय घेतो की वाचकाला धक्का बसतो.

पेंडसेंनी या आणि अजून बऱ्याच पात्रांभोवती कथा छान गुंफली आहे. तरी सर्वांनी एकदा वाचावीच अशी दीर्घ कादंबरी.
Comments

Popular Posts