अधर्मयुध्द

 अधर्मयुध्द

अधर्मयुध्द
लेखक: गिरीश कुबेर
प्रकाशक: राजहंस प्रकाशन

धर्मकारण हेच राजकारण असे विचार जेव्हा लोकांच्या मनावर बिंबवले जातात आणि राजकारणाच्या गाडीचे इंजिन जेव्हा धर्मकारण खेचू लागते तेव्हा हि एका अधर्मयुद्धाची चाहूल असते.

गिरीश कुबेरांनी आखातातील घडामोडींवर 3 पुस्तके लिहली आहे, त्यातील हे शेवटचे पुस्तक. यापुर्वीची 2 पुस्तके तेल (Oil) या विषयाशी निगडित आहेत. ती पुस्तके वाचली आणि बऱ्याच वाचकांनी अधर्मयुध्द वाच म्हणून सुचवले. तसे हे पुस्तक मागील लॉकडाऊन च्या काळातच मिळाले होते पण विविध कारणांमुळे वाचायला थोडासा उशीरच झाला. अखेरीस 2 आठवड्यावपूर्वी पुस्तक वाचून पूर्ण झाले.

लेखकाचा कठीण विषय सोप्या शैलीत मांडायचा हातखंडा या पुस्तकातपण पुन्हा ठळकपणे दिसून येतो. तर या पुस्तकात आखातात तयार झालेला आणि नंतर जगभर पसरलेला इस्लामिक दहशतवाद या विषयाचा मागोवा घेतला आहे. धर्मांध व्यक्तींनी शांतताप्रिय इस्लामचा स्वतःच्या फायद्यासाठी कसा अर्थ लावला आणि त्याचे रूपांतर दहशतवादाच्या अधर्मयुद्धात कस झालं याच काही अंशी उत्तर या पुस्तकात मिळते. हे पुस्तक वाचताना आपण एक माहितीपट पाहतोय असे राहून राहून पुन्हा वाटते.

लेखकाने अगदी सुरवातीपासून म्हणजे वहाबी आणि इब्न सौद यांची युती होऊन एक संपूर्ण देश कसा तयार झाला इथून पुस्तकाची सुरवात केली आहे. यात पुढे ब्रदरहूड ची स्थापना आणि ऑटोमन साम्राज्याचा ऱ्हास कसा झाला, त्यातून आपल्या ताटात काहीतरी पडावे म्हणून इंग्लड व इतर युरोपातील राष्ट्रांची धडपड. या ब्रदरहूडची व्याप्ती एवढी मोठी आहे की जगातील जवळपास सर्व दहशतवादी संघटनांची या ब्रदरहूड संघटनेशी नाळ कुठेना कुठे हि आजगत जुळलेली आहे. इजिप्तची क्रांती, अमेरिकेची दुट्टपी भूमिका त्यातून त्यांना स्वतःला बसलेल्या झळा, आजची गाझा पट्टी म्हणजे जगातील सर्वात असुरक्षित आणि संवेदनशील जागा कशी झाली, शीतयुद्धाच्या अफगाणिस्तानला बसलेल्या झळा आणि त्यातून आजगत उभारी घेऊ न शकलेला देश, दहशवादी संघटनांना आर्थिक रसद पुरावणारी अफूची शेती या सर्व मुद्द्यावर लेखकाने सोप्या शब्दात लेखन केलं आहे.

यावर पुढे इथे जास्त लिहणासारखे नाही, जे आहे ते पुस्तक वाचून पडताळून पाहावे असे आहे. ही काही कादंबरी नाही त्यामुळे काही ललित वाचायला मिळणार असे मनात ठेऊ नका निश्चित भ्रमनिरास होईल. मात्र पुस्तक वाचल्यावर साम्राज्यवादी आणि स्वार्थी सूत्रधारां विरुद्ध एक अस्पुटशी चीड मात्र नक्की राहते आणि त्यांनी आपल्या स्वार्थासाठी पूर्ण देश, तेथील व्यवस्था कठपुतली सारखी नाचवून तीची केलेली वाताहत अस्वस्थ करून सोडते.

Comments

Popular Posts