एका तेलियाने

एका तेलियाने


 

एका तेलियाने
लेखक: गिरीश कुबेर
प्रकाशक: राजहंस प्रकाशन

गिरीश कुबेर यांचं 'हा तेल नावाचा इतिहास आहे' यावर एक छोटी समीक्षा लिहल्यावर बहुतांशी वाचकांनी हे पुस्तक सुचवले. कुबेर यांचं लेखन आणि विषयाचा अभ्यास आवडला असल्यामुळे हे पुस्तक उपलब्ध झाल्यावर लगेचच वाचायला घेतले.

नावाप्रमाणे पुस्तक तेलाच्या दुनियेतील एका प्रतिभाशाली आणि भारदस्त व्यक्ती वर आधारित आहे. शेख अहमद झाकी यामानी ज्यांनी तेल नावाचा इतिहास वाचले आहे त्यांना ही व्यक्ती कोण आहे हे वेगळे सांगावे लागणार नाही. सोप्या शब्दात ओळख करून द्यायची तर सौदी अरेबिया चे माजी तेलमंत्री.

पुस्तकाची सुरवात ही ओपेक पासून होते. लेखक काही तेलियांची ओळख करून देतात. यात ज्यांच्या नावावरून पूर्ण देशाला सौदी अरेबिया नाव पडले असे इब्न सौद आणि महंमद मोसादेघ यांचा समावेश आहे. पुढे काही प्रकरणानंतर यामानी यांचा प्रवेश होतो आणि कथानक विस्तृत होत जाते. शिक्षणातील त्यांची घोडदौड, भविष्यवेधी विचार क्षमता आणि मुत्सद्देगिर याची चुणूक काही प्रकरणातच आपल्याला दिसून येते. एकंदरीत पुस्तक विस्तृत तेल राजकारण आणि मध्यावर असणारे यामानी यावर आधारित आहे.

पुस्तकात दिलेली माहिती फारच रंजक आहे. यापूर्वीच्या पुस्तकात लेखकाने तेलाचा जगभरातील प्रवास चांगल्याप्रकारे टिपला आहे या पुस्तकात तेला बाबतचे राजकारण आणि यामानी यांची डिप्लोमसी यावर छान लेखन केले आहे. लिबियाचे कर्नल गडाफी, सिरियाचे असद यांची सुरवात कशी झाली याची माहिती, आखातातील देशातील राजघराण्यातील लोकांनी पैशाच्या शिखरावर असताना केलेली मिजास वाचून डोळे विस्फारतात. यामानी यांची टीफनी, कार्टीयर या सारख्या अनेक super luxurious ब्रँड्स मध्ये गुंतवणूक आहे हे वाचून तर धक्काच बसला.

पुस्तक जास्त मोठे नाही पण अभ्यासपूर्वक वाचले तर नक्कीच काही दिवस घेईल. आपणास जर तेल नावाचा इतिहास आवडले असेल आणि आखातातील तेल राजकारणावर अजून माहिती हवी असेल तर नक्कीच वाचावे असे.

यानंतर याच शृंखलेतले तिसरे पुस्तक अधर्मयुद्ध वाचायला घेणार आहे. तेव्हा पुन्हा लिहायचा प्रयत्न करेल.

Comments

Popular Posts