मुंबई, दिनांक
मुंबई, दिनांक
मुंबई, दिनांक
लेखक: अरुण साधू
प्रकाशक: मॅजेस्टिक पब्लिकेशन
अरुण
साधू यांचं मी वाचलेलं पहिले पुस्तक. हे पुस्तक ७०-८० च्या दशकातील आहे.
पुस्तकाची भाषा ही सोपी आणि आपल्या रोजच्या वापरातील आहे त्यामुळे
पुस्तकाशी लगेचच एकरूप होता येत.
पुस्तकाचं कथानक हे मुबंई मधील
एकाच दिवशी चालू असलेल्या राजकीय आणि अराजकीय घटना यावर आधारित आहे.
प्रत्येक पात्राच्या नजरेतून ते पुढे सरकत राहतं. सुरवात ही एका
वार्ताहराच्या दिवसाने होते आणि पुढे मुख्यमंत्री, कामगार युनियन नेता काही
तस्कर असा प्रवास चालतो. कथानक सुरवातीपासूनच वाचकावर पकड घेतं. सर्व
पात्र फार छान फुलवली आहेत त्यामुळे काहीवेळातच आपल्याला जवळची वाटू
लागतात. कथानकामध्ये काही अराजकीय घटनांची आणि गूढ घटनांची सांगड घातली आहे
त्यामुळे उत्कंठा वाढत जाते.
आपण एकाच दिवसाच कथानक वाचतोय हे आपण
प्रत्येक प्रकरणात विसरून जातो आणि पुढील नवीन प्रकरणाच्या सुरवातीला
पुन्हा त्याच दिवसावर येतो हा चांगला अनुभव आहे. कथानक मुंबईत असून लेखकाने
मुंबईचं जास्तीचे वर्णन शिताफीने टाळले आहे.
पुस्तकातील सर्वात
जोरदार पात्र मला जिवाजीराव शिंदे आणि डी कास्टा हे वाटले. पुस्तकाने एक
चित्रपटाची कथा वाचल्याचा अनुभव दिला. एवढं सर्व असून पुस्तकाचा शेवट मात्र
अपूर्ण वाटला.
पुस्तक हलकेफुलके आणि एका बैठकीत संपावण्यासारखे
आहे. त्यामुळे एकदा वाचण्यास हरकत नाही. यातील काही प्रसंग चित्रपटात
पहिल्यासारखे वाटतील. मला वयक्तिक शेवट अपूर्ण वाटला आपल्याला कदाचित वेगळा
वाटू शकतो.
Comments
Post a Comment