रक्तचंदन

 

रक्तचंदन
लेखक: जी. ए. कुलकर्णी

जी. ए. च साहित्य वाचायचे असे बरेच दिवस मनात होते. आणि आज अखेरीस ते शक्य झालं. रक्तचंदन हे जी. ए. च मी वाचलेले पाहिले पुस्तक. यांच्या साहित्याबाबत याआधी खूप ऐकले होते. यापूर्वी आनंद यादव यांची नटरंग ही शोकांतिका देखील वाचली होती आणि त्यानंतर होणारी मनाची घुसमट देखील अनुभवली. पण जी. ए. चे लिखाण हे रसायन काहीतरी वेगळेच आहे आणि हे वाचल्यावर शोकांतिकांना देखील पैलू असतात हे समजले.

तर रक्तचंदन एक कथासंग्रह आहे. यातील सर्व कथांना एक दुःखाची कड आहे आणि ती कड पूर्ण कथेत आपली सोबत करते. यात कथा आहे दुदैवी म्हणावं अशा लोकांच्या, त्यांच्या संघर्षाच्या, त्यांच्या पराभवाच्या आणि त्यांच्या समर्पणाच्या. प्रत्येक कथेचा शेवट आपल्याला सुन्न करून सोडतो.

जी. ए. चं लेखन आणि त्यांची आपल्या सभोवतालची उपेक्षित अशी पात्रे निवडायची पद्धती, त्यांना व्यवस्थितपणे फुलवणे आणि अखेरीस भावनांच्या हिंदोळ्यावर सोडून देणे याचा प्रत्यय सर्व कथांमध्ये वारंवार येतो. कथा एकत्र वाचल्या नंतर एक भकासपणा मात्र मागे राहतो हे निश्चित. त्यामुळे लेखकाचं पुढचे साहित्य लगेचच वाचायला घेईल यावर शंका आहे.

पुस्तकातील काही लक्षात राहण्यासारख्या कथा म्हणजे जन्म, राधी, वस्त्र आणि माघार. बाकी ज्यांना करुणारस अनुभवायचाय आणि आजूबाजूच्या सामान्य लोकांच्या जीवनातील प्रसंग वाचायचे आहे त्यांनी पुस्तक नक्की वाचावे. बाकी वाचकांनी याच्या वाटेला न गेलेलच बर.

Comments

Popular Posts